भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या १५ वर्षांपासून भडगाव बस स्टँड मध्ये भर उन्हाळ्यात प्रवाशांना व सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने नागरिकांची तहान भागाविण्यासाठी स्व.डॉ. योगेश राजेंद्र पाटील फाऊंडेशन तर्फे मोफतथंड पेय जल सेवा राबविण्यात येते. भडगाव बसस्थानक येथे पेय जल सेवेचे उद्घाटन आ.किशोर पाटील यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेन्द्र पाटील, युवानेते सौरभ पाटिल, डॉ प्रमोद पाटील, युवराज पाटील, इम्रान अली सय्यद, स्व. बापूजी युवा फाऊंडेशन चे संस्थापक लखीचंद पाटिल, सुरेंद्र मोरे, बापू पाटील,विनोद जुलाल पाटिल, नगरसेवक नंदकिशोर देवरे, युवा सेनेचे निलेश पाटिल, प्रशांत पाटील, पत्रकार संजय पवार, नरेंद्र पाटील, राजूभाऊ शेख, सागर महाजन, निलेश महाले, प्रितम भंडारी, राजू आचारी, देवाजी अहिरे, चेतन पाटील, जहांगीर मालचे, सुरेश सोनवणे, शिवशाही प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश पाटील, प्रवीण महाजन सर , प्रशांत चित्ते सर, सोनू पाटिल, श्रीराम पाटील, जितु आचारी, भरत पाटील, हेमसागर पाटिल, योगेश शिंपी, अवधूत पाटील, प्रवीण परदेशी आदींसह गावातील नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी जलसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी बोलतांना केले.
बसस्थानक मध्ये जादा दराने पाणी पिणे प्रवाशांना खर्चिक होते.तर गरीब प्रवाशांना ते नपरवडनारे आहे. मात्र वाढत तापमान हे जीवाची लाहीलाही करणारे ठरते . त्यावर सेवा म्हणून “स्व.डॉ. योगेश राजेंद्र पाटील फाऊंडेशन च्या वतीने दर वर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील , सौरभ पाटील हे पाणीपोई सुरु करत असतात. थंड पाणी पिण्याचा तालुक्यातील असंख्य लोक ,प्रवाशी लाभ घेतात. आज उदघाटन प्रसंगी आ पाटील यांनी पाणी पिऊन शुभारंभ केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जलसेवेचा लाभ घेतला. तर प्रवाशांनी हि समाधान व्यक्त केले.