Home Cities एरंडोल अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
32

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ५ एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तिविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेले. दरम्यान, पिडीत मुलीचे नातेवाईक घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही तिची माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound