भाजपा वर्धापन दिनानिमित्त सावरकर गौरव यात्रेला सुरूवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  संपूर्ण विश्वात व देशात एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी असून आज पक्षाचा ४३वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. भाजपा जळगाव जिल्हा व महानगरच्या वतीने जिल्हा कार्यालय वसंत स्मृती बळीराम पेठ येथे सकाळी ९ वाजता भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्याहस्ते भारतमाता, पंडित दीनदयाल, डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

 

यानंतर पक्ष ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी जि.प. उपाध्यक्ष लालंचद पाटील, महापालिक गटनेते राजेंद्र घुगे पाटील, ग्रामीणचे प्रभाकर पवार आदी उपस्थित होते. यानंतर देशातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित केले.  या नंतर राजकीय क्षेत्रातील, सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय, शैक्षणिक, उदयोग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४३ नागरिकांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी आ. भोळे यांनी सांगितले की, जनसंघने भाजप हा पक्षाचा प्रवास असून ४३वर्षांमध्ये पक्षाने विश्वात एक नंबरचा पक्ष म्हणून नावलौकिक केलेले आहे. ते फक्त पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्याग बलिदाना मुळेच आज पक्ष देशात एक नंबरचा पक्ष म्हणून विश्वामध्ये आहे. देशाचे यशस्वी  असून  तळागाळापर्यंत विविध योजना पोचवण्याचे कार्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे, म्हणून भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून ३६५ दिवस अहोरात्र मेहनत करणारा भाजपा हा  कार्यकर्ता आहेश्‍ असे  प्रसंगी त्यांनी सांगितले.

 

सावरकर गौरव यात्रेला सुरूवात

या नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रा  पक्ष कार्यालय येथून सुरू होऊन सुभाष चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यारर्पण  करण्यात आले. या यात्रेत  शिवसेनेचे गणेश सोनवणे, सरिताताई माळी-कोल्हे, दिलीप पोकळे, शोभा चौधरी व पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. “वंदे मातरम, भारत माता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकर अमर हे, जप तक सुरज चांद रहेगा सावरकरजी का नाम रहेगा” अशा घोषवाक्याने संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळा येथे सावरकरांना अभिवादन करण्यात आले व कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षाचे सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केले. पक्ष कार्यालयावर सुंदर अशी रोशनाई करण्यात आली.

Protected Content