भगवान महावीर जयंतीनिमित्त गोसेवा समितीला ५१ हजाराचा धनादेश प्रदान

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भगवान महावीर जयंतीनिमित्ताने धरणगाव नगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या चार अनुदानाची ५१ हजार रूपयांची रक्कम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. हा धनादेश सी.एस.पाटील आणि राजू ओस्तवाल यांनी स्विकारला.

 

भगवान महावीर जयंतीनिमित्ताने मंगळवारी धरणगाव नगरपालिकेच्या वतीने चारा अनुदानासाठी ५१ हजाराचा रक्कम देण्यात आली. याचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. याप्रसंगी पप्पू भावे, विलास महाजन, मोती पाटील, गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सी.के. पाटील, संजय महाजन, वसंतराव भोलाणे, मोहनजैन, गोसेवा समितीचे प्रमुख अजय पगारीया, डॉ. मिलिंद डहाळे, सेवा समितीचे किशोर डेडिया, संजय ओस्तवाल, प्रवीण कुमट, सुमित संचेती, गीतेश ओस्तवाल, मुकेश पगारिया, जतिन नगरिया, पंकज दुग्गड, स्वप्नील जैन, शैलेश ओस्तवाल यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content