वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील काँग्रेस भवनसमोरील रस्त्यावरील वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे, याप्रकरणी सोमवार, २७ मार्च रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसात गुन्हा दाखल झाला असून डंपर जप्त करण्यात आले आहे.

 

जळगाव शहरातील काँग्रेसभवन समोरुन वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एम.एच.१९ झेड ९९९१ या क्रमाकांच्या डंपरवर २५ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली, या कारवाईत पोलिसांनी डंपरसह ४ हजार रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास महसूल विभागाचे कर्मचारी नितीन ब्याळे वय ३९ यांच्या फिर्यादीवरुन डंपरवरील चालक आणि मालक या दोघाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विजय निकुंभ हे करीत आहेत.

Protected Content