जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगर येथे बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत बुधवार २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम भानुदास राकेश (वय-६४) रा. चिमुकले बालाजी मंदिर, आयोध्या नगर, जळगाव हे सेवानिवृत्त कर्मचारी असून आपला परिवारासह वास्तव्याला आहे. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता ते घर बंद करून नातेवाईकांच्या घरी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचे पाहून संधी साधत मध्यरात्री घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व चांदीच्या मुर्त्या असा एकूण २३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आला. या संदर्भात उत्तम राकेश यांनी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्पाफ पठाण करीत आहे.