भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ मंडळ रेल्वे प्रंबधक कार्यालयातर्फे पर्यावरण दिनानिमित्त आज (दि.४) ‘पर्यावरण जनजागृती रॅली’ काढण्यात आली होती. यावेळी नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मंडळ रेल्वे प्रंबधक कार्यालयातर्फे यानिमित्त २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रंबधकांनी सांगितले की, विभागात दोन लाख वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. लागवड केल्यानंतर सर्व वृक्षांची देखभाल करण्यात येईल, तसेच त्यांना वेळोवेळी पाणी व खत पुरवठाही केला जाईल. आजच्या काळात वृक्षारोपण करणे आवश्यक आहे, वृक्षारोपणाचा पर्यावरण सांभाळण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले. पर्यावरण दिनानिमित्त ‘पर्यावरण जनजागृती रॅली’ डीआरएम कार्यालयापासून ते रेल्वे स्टेशनवरील गांधी पुतळ्यापर्यंत काढून रेल्वे स्कूलमध्ये तिचा समारोप करण्यात आला.