Home क्राईम रावेर तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

रावेर तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रावेर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ मार्च रोजी रात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. शनिवारी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound