पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमटीएस परीक्षेत येथील महावीर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात पाच विद्यार्थी राज्यपातळीवर चमकले.


यात इयत्ता तिसरीतून दुसाने अरविंद अशोक ३३ वा, प्रज्वल राजेंद्र सोनवणे ३५ वा, इयत्ता चौथीतून रोहन दीपक बनकर २५ वा, श्रद्धा गजानन देशमुख ३९ वी, इयत्ता सहावीतून भावेश ईश्वर बारी २८ वा, जामनेर सेंटर मधून तिसरीतून अरविंद अशोक दुसाने प्रथम, अंजली अनुप पांढरे द्वितीय, प्रज्वल राजेंद्र सोनवणे द्वितीय, वर्ग चौथीतून जामनेर सेंटरमधून रोहन बनकर प्रथम, श्रद्धा गजानन देशमुख द्वितीय, वर्ग इयत्ता सहावीतून भावेश ईश्वर बारी प्रथम असे यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका दीपाली हटकर कविता लाड, अनिता कंडारे,यांच्यासह प्राचार्या सौ एस,आर,कुलकर्णी, श्री चव्हाण सर, असिफ पिंजारी यांच्यासह इतर सर्व शिक्षक वर्ग यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप लोढा, उपाध्यक्ष तेजराज जैन, सचिव दीपक लोढा,
संचालक श्याम सावळे, सचिन पाटील, विपीन लोढा, पंकज लोढा यांनी अभिनंदन केले आहे.



