मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक ते रेणूकामाता मंदीराचा रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने येथील नागरीकांना मोठा सामना करावा लागत आहे. गटारीतील पाणी रस्त्यावर आणि रस्ता ओबडधोबड असल्याने नागरीकांचे आरोग्याशी खेळ खेळला जात आहे
विकासाचा बनाव असणार्या मुक्ताईनगर शहरात सर्वात वंचित प्रभाग म्हणुन प्रभाग क्र.१३ ठरला आहे. ह्या प्रभागातील राहिवासींना साध्या मुलभुत अजून पर्यंत मिळालेल्या नाही. या रस्ते, गटारी, पथदिवे आणि स्वच्छता नसल्याने नागरीकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बसस्थानक ते रेणुकामाता मंदीराचा रस्ता मंजुर करण्यात आला. कामाला सुरूवात देखील झाली. रस्त्यावर दगडगोटे टाकुन आहे. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. दररोज अपघात होतांना दिसुन येत आहे. विशेष म्हणजे ह्याच प्रभागात शाळा असल्याने मुलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. दररोज कित्येक मुले ह्या दगडांवरून जात असतांना पायाला दुखापत होत आहे. वाहनांचा अपघात होत आहे. पण ह्याची चिंता ना प्रशासनाला आहे ना येथल्या लोकप्रतिनिधींना.
वारंवार निवेदन व समस्यांची तक्रार देवूनही याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असतांना दिसून येत आहे. शिवाय गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागररीकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. वेळीच प्रशासनाने याकडे लक्ष देवून प्रलंबित काम पुर्ण करावे असे मागणी केली जात आहे.