Home क्राईम दुचाकीवरून पडलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकीवरून पडलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू


accident

जळगाव प्रतिनिधी । दुचाकी घसरल्याने जखमी झालेल्या तरूणाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.  याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र दिलीप पाटील वय-33 रा. खेडी ता.जळगाव हा शनिवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी जात असतांना रॉका फर्निचर येथे दुचाकी घसरली. या अपघात राजेंद्र पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री 21.45 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. कुमावत यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound