पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।शहरातील कृष्णापूरी भागातील मारूती मंदीराच्या परिसरातून ६५ वर्षीय वृध्दाच्या हातातून ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीदास शंकर चौधरी (वय+-६५) रा. कृष्णापूरी, पाचोरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी कृष्णापुरी भागात आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी ते गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातील ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल संशयित आरोपी जसवंत सिसोदिया (वय-२८) रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश याने चोरून नेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक करती आहे.