यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील बसस्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलगी ही शाळेतून घरी जात असतांना तिचा पाठलाग करून मोबाईल क्रमांक मागत छेडखानी करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल बसस्थानक परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे शाळून घरी जात असतांना संशयित आरोपी आनंद बऱ्हाटे हा तरूण तिचा पाठलाग करून तिचा मोबाईल क्रमांक मागितला. मुलीने मोबाईल क्रमांक दिला नाही म्हणून तिची छेडखानी केली. नंतर तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकारानंतर पिडीत मुलीने वडीलांना घटनाक्रम सांगितला. मुलीची छेडखानी केल्यानंतर तिच्या वडीलांनी तरूणाचे घरी जावून मुला जाब विचारला असता त्याने आनंद बऱ्हाटे याने पिडीत मुलीच्या वडीलांशी धक्काबुक्की केली व पसार झाला. त्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या आई व वडीलांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आनंद बऱ्हाटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे व पोलीस कर्मचारी करीत आहेत, संशयीत आरोपी आनंद बिऱ्हाडे यांचा पोलीस शोध घेत आहेत