जळगाव प्रतिनिधी । घरासमोर रात्री नेहमीप्रमाणे उभ्या केलेल्या रिक्षातून चोरट्याने 1200 रुपये किमतीची रिक्षाची बॅटरी लांबविल्याची घटना 31 रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी रविवारी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्लामपुर्यात शेख सलीम शेख फय्याज हे पत्नी व दोन मुली व एक मुलगा अशा कुटुंबासह वास्तव्यास आहेत. इस्लामपुर्यातीलच रहिवासी शमीर शेख फारुख याच्या मालकीची रिक्षा एम.एम 19 व्ही 7781 चालवितात. शेख सलीम यांनी 31 रोजी दिवसभर प्रवासी वाहतूक करुन रात्री 9 वाजता रिक्षा घरासमोर उभी केली. सकाळी रिक्षा घेवून जाण्यास निघाले असता रिक्षा सुरु होत नव्हती, त्यांनी रिक्षाचे सीट उचकावून बघितले असता, बॅटरी गायब होती. प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र मिळून न आल्याने त्यांनी 2 जून रोजी शनिपेठ पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी शेख सलीम यांच्या फिर्यादीवरुन 1200 रुपये किमतीची बॅटरी लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अभिजित सैंदाणे करीत आहेत.