Home Cities जळगाव ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना दिलासा

ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना दिलासा

e7d6ee0959fe3358e00e50e2bf6f55dc
e7d6ee0959fe3358e00e50e2bf6f55dc

e7d6ee0959fe3358e00e50e2bf6f55dc

जळगाव (प्रतिनिधी) उन्हामुळे होरपळणार्‍या जळगावकरांना आज (दि.२) दुपारी अचानक आलेल्या ढगांमुळे दिलासा लाभला. त्यातच जळगाव-भुसावळ रस्त्यावरील साकेगाव येथे पावसानेही हजेरी लावली होती.

 

एकीकडे हवामान खाते यंदा पावसाळा उशिरा असल्याचा अंदाज व्यक्त करीत असताना आज अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकाना दिलासा लाभला आहे. हा नियमित पाऊस नसल्याने असा अवेळी पाऊस आल्यानंतर अंदाजानुसार प्रत्यक्ष पावसाळा लांबण्याचीच शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound