मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागण्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर दिली आहे.
भारतीय जनता पक्षाने सत्यजीत तांबे यांना अधिकृत पाठींबा दिला नसला तरी उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाजपच्या नेते आणि पदाधिकार्यांनी त्यांच्यासाठी काम केल्याचे काल मतदानाच्या दिवशी दिसून आले. यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठिकठिकाणी आपल्या पदाधिकार्यांनी तांबे यांना पाठींबा दिल्यामुळे निकाल चांगला लागेल असा आशावाद व्यक्त केला.
दरम्यान, बावनकुळे यांनी थेट सत्यजीत तांबे यांना ऑफरच देऊन टाकली. ते म्हणाले की, तांबे हे जर भारतीय जनता पक्षात येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करू ! यामुळे पदवीधरचा निकाल लागल्यानंतर सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आता रंगली आहे