Home क्राईम अश्लिल शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग !

अश्लिल शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुभाष चौकात बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलेचा रिक्षाचालकाने अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मेहरूण परिसरात राहणारी २५ वर्षीय महिला हे रविवारी २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता शहरातील सुभाष चौकात बाजार खरेदीसाठी आलेल्या होत्या. त्यावेळी एका रिक्षाचालक जात असतांना महिलेचा साडीचा पदर रिक्षात अडकला. या घटनेत महिलेची साडी फाटली गेली. दरम्यान रिक्षा चालक गयासोद्दिन रफिओद्दीन शेख (वय-४८) रा.उस्मानिया पार्क, जळगाव याला याबाबत जाब विचारला असता त्याने माफी न मागता महिलेला अश्लिल शिवीगाळ करून कानखाली मारली व हात पकडून ढकलून देत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून रिक्षा चालकाविरोधात तक्रार दिली. रात्री ९ वाजता रिक्षा चालक गयासोद्दिन रफिओद्दीन शेख (वय-४८) रा.उस्मानिया पार्क, जळगाव याच्यावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.


Protected Content

Play sound