जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तळेले कॉलनीतील दत्त मंदीराजवळ कारमध्ये ठेवली रोकड व दागिन्याची पर्स असा एकुण ४ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनिषा चंद्रशेखर पाटील (वय-४२) रा. दत्त मंदीरजवळ, तळेले कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या कारच्या बोनटजवळ त्यांनी पर्स ठेवलेली होती. पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ४ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल ठेवलेला होता. अज्ञात चोरट्याने कारच्या बोनटवरून दागिने व रोकड ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मनिषा पाटील यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी २९ जानेवारी रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.