जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याला दुचाकीचा कट मारल्याचा बहाणा करून त्याच्याजवळील ८ लाखाची रोकड असलेली पिशवी, लॅपटॉप व इतर मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यातील ५ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ईश्वर बालू मेघाणे रा. सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे दाणा बाजार परिसरात बाबा हरदासराम ट्रेडर्स नावाचे होलसेल मालाचे दुकान आहे. २३ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून उधारीचे व दिवसभरात दुकानातील माल विक्रीची करून मिळालेले एकूण ८ लाख रुपयांची रोकड पिशवीत ठेवले होते. सोबत लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, हार्डडिस्क आणि दुकानातील डायरी असे देखील वस्तू ठेवलेल्या होत्या. रात्री ते दुचाकीने घरी जात असताना शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या रामदेवबाबा मंदिरासमोर जात असताना दोन जण दुचाकीने येवून त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे ईश्वर मेघांनी यांनी दुचाकी हळू चालवत होते. त्यानंतर यातील एक जणांनी त्यांच्या दुचाकीला लावलेली ८ लाख रुपयांची पिशवी व मुद्देमाल जबरी हिस्कावून चोरून नेला होता. या संदर्भात त्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत चोरटे पसार झाल होते. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वेगवेगळ्या तीन पथक तयार करून आरोपींचा पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात एकूण पाच जणांना अटक करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सुधाकर अंभोरे, विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पो.ना. विजय पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोउनि आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, गणेश शिरसाडे, सचिन मुंडे, रामकृष्ण पाटील, अल्ताफ पठाण, पो.ना. इमरान सय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन बारी, विकास सातदिवे, मुदस्सर काझी, पोहेकॉ मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंडे, सतीश गर्जे अशांचे वेगवेगळे तीन पथक करून एकूण ५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद सिंग पाटील करीत आहे.