जळगाव प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांच्या एका फेसबुक पोस्टवर वाद निर्माण झाला, तथापि, सामोपचाराने याला मिटवण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर महिलांविषयी अवमानकारक मजकूर पोस्ट केल्याचा आरोप करून शहरातील सर्वपक्षीय महिलांनी त्यांचा निषेध केला आहे. यामुळे शहरातील महिलांनी शनिवारी रात्री रामानंद नगर पोलिस स्टेशन गाठून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला. मात्र त्याच वेळी शिवराम पाटील रामानंद नगर पोलिस स्टेशन मध्ये स्वतःहून हजर झालेत. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून शिवराम पाटील यांना माफी मागण्याची सूचना केली. यानुसार शिवराम पाटील यांनी महिलांची माफी मागून फेसबुक वरील पोस्ट डिलीट करण्याचे आश्वासन दिले. यामुळे हा वाद सामोपचाराने मिटला. तथापि, यावरही महिलांचे समाधान न झाल्याने यासंदर्भात रविवारी होणार्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी शोभा चौधरी, सरिता माळी, मंगला बारी, वंदना पाटील, रेखा पाटील, जयश्री पाटील आदींची उपस्थिती होती.