भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब विजय महाजन यांनी भूषविले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप महाजन, संचालक प्रकाश बच्छाव, पालक सभेचे उपाध्यक्ष हेमंत पिसाळ, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष मनिषा पाटील, डॉ.स्वाती अहिरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे नुकतेच अल्पशा आजाराने दिवंगत सचिव कै. विलास महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात येऊन विद्यार्थ्यांमार्फत स्वागतगीत सादर करण्यात आले.
त्यानंतर बालवर्ग ते इ. ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर विविध कलागुण सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात नृत्य, नाटिका, वेशभूषा, वक्तृत्व आदी कला सादर करण्यात आली. संस्था, शाळा व पालकांनी विद्यार्थ्यांवर बक्षिसे लुटली. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती रामकुवर यांचे मार्गदर्शन लाभले.