Home क्राईम ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय नजीकच्या खळ्यातून ट्रॅक्टरची ५ हजार रूपये किंमतीची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटन समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, देविदास माधव कोल्हे (वय-३९) रा. भादली ग्रामपंचायत कार्यालयजवळ ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्यात जागेत त्यांचे शेतीचे अवजारे व ट्रॅक्टर लावण्यासाठी खळे तयार केले आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ डीव्ही ३९८७) उभा असतांना अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ५ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरी करून नेल्याचे सोमवारी १६ जानेवारी रोजी उघडकीला आले आहे. त्यांनी बॅटरीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती न मिळल्याने अखेर दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवलदार नुर खान करीत आहे.


Protected Content

Play sound