पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील बाहेरपुरा भागातील भोईवडा, भारतीय नगर, सम्राट अशोक नगर, जिजामाता नगर येथील स्वच्छता, पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय, पाणी तुंबलेल्या गटारी, या समस्यांबाबत आज भाजपचे शहर उपाध्यक्ष वीरेंद्र चौधरी व संपादक प्रवीण ब्राम्हणे यांनी पालिकेत जाऊन नगराध्यक्षांची भेट घेवून तक्रार केली असता त्यांनी या समस्यांचा आढावा घेतला.
तसेच उपमुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, शरद पाटे, सतीश चेडे, आरोग्य सभापती यांनी तात्काळ समस्यांचा आढावा घेवून त्यांनी वार्ड क्र. ५ मधील नेमून दिलेले मुकादम व कर्मचारी यांची झाडाझडती घेतली. या संदर्भातील कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.