Home धर्म-समाज डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करा ; राष्ट्रवादीची मागणी

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करा ; राष्ट्रवादीची मागणी

14f9da93 ef93 452f 951c 4f22c9a75e34
14f9da93 ef93 452f 951c 4f22c9a75e34

14f9da93 ef93 452f 951c 4f22c9a75e34
 

यावल ( प्रतिनिधी) डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी येथील प्रांतअधिकारी डॉ. अजीत थोरबोले व तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज सकाळी निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की, डॉक्टर पायल तडवी ही आदिवासी समाजातील मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत असताना तिला डॉ भक्ती, डॉ आहूजा व डॉ खंडेलवाल या तिघं डॉक्टरांनी नेहमी मानसिक त्रास देत, अपमानास्पद वागणूक देत होत्या. नेहमीच्या त्रासास कंटाळून डॉ पायल हिला आत्महत्तेस प्रवृत केले. या प्रकरणास जबाबदार डॉक्टर यांच्यावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूण कठोर शिक्षा व्हावी, न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले व तहसिलदार जितेंद्र कुंवर यांना देण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, सुखदेव बोदवडे नाना, रा. का. चे युवा अध्यक्ष देवकांत पाटील, आदिवासीचे जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, राष्ट्रवादी किसान सेलचे वसंत पाटील, भैय्यासाहेब पाटील, अरुण लोखंडे, गणी खान, अकबर भाई खाटीक, करीम भाई मन्यार, निवृत्ती धांडे, डी.के.पाटील, भास्कर वासुदेव पाटील, सरपंच विकास पाटील, निसार दगडू तडवी,प्रशांत पाटील, चेतन आडळकर, निलेश बेलदार, चंद्रकांत पाचपोळ, भगवान बर्डे, परमार तडवी, निवृत्ती पाटील, आरिफ खान युनुस तडवी, विजय साळी, अनिल कोळी, नाना कोळी, अमोल दुसाने यावेळी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound