जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरूवर्य प.वि. पाटील प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीत शिकणाऱ्या २१० विद्यार्थ्यांसाठी ‘माझी शिस्त, माझा अभ्यास’ हा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आला.
या उपक्रमात शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी व मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना दहा नियम लेखी देत त्यांचे महत्व पटवून दिले. संकल्प ते समारोप या उपक्रमांतर्गत हा विशेष उपक्रम शाळेत प्रथमच सुरू करण्यात आला आहे.
असे आहेत दहा नियम
१. मी दररोज शाळेची तयारी स्वत: करेल, सर्व वस्तू (दप्तरासह) व्यवस्थीत संभाळेन.
२. वस्तू हरवणार नाही, कुणाच्या घेणारही नाही.
३. घरात सर्वांचं नीट ऐकून घेत, शांतपणे बोलेन.
४. दररोज वर्गात झालेल्या सर्व विषयांचा अभ्यास घरी जात, मोठ्याने वाचन गृहपाठ पुर्ण करेन, न केल्यास शिक्षा स्विकारेन, अभ्यासासाठी पाटी,, पेन्सिलचा दररोज वापर करेन
५. दररोज ५ ओळी मराठी व इंग्रीजीच्या लिहीन, त्यावर दररोज सांध्याकाळी आई व वडीलांची सही घेईन.
६. हट्ट न करता, बाहेरचे पदार्थ न खाता घरातील पदार्थ खात भाजी, भाकरी, पोळी, भात, उसळी खाईन
७. वर्गाची शिस्त पाळेन, न पाळल्यास दिलेली शिक्षा स्विकारेन, बडबड करणार नाही, उलट अभ्यासासंबंधी शंका/प्रश्न विचारीन.
८. २ ते २० पर्यंतचे पाढे पाठ करून लिहीन.
९. वाचण्यासारखं हस्तक्षर काढत, सराव करीन.
१०. आणि दररोज मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास याचं थोडंथोडं वाचन करीन