जळगाव प्रतिनिधी । करोडो लोकांच्या आयुष्यात महत्वाचे स्थान असणार्या एस.टी. च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी बस प्रवास केला.
आज एस.टी. चा वर्धापन दिन आहे. या निमित्त आज सकाळी जळगाव आगारात प्रवाशांचे पुष्प गुच्छ आणि पेढा भरवून स्वागत करण्यात आले. जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी अधिकार्यांसह प्रवाशांचे स्वागत केले. यानंतर ना. महाजन यांनी जळगावहून जामनेरला एसटीतून प्रवास केला.