Home प्रशासन नगरपालिका रूग्णालयाला राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी

रूग्णालयाला राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामीण रूग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय असे नाव देण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनातून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सावदा येथे ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण रूग्णालयासाठी जागा सावदा नगरपालिकेने मोफत उपलब्ध करून महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात आलेली आहे. जागा वर्ग करतेवेळीजो ठराव संमत करण्यात आला आहे, त्या ठरावानुसार सदरील रुग्णालयास त्यावेळी असलेले राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे नांव देण्यात यावे अस म्हटले आहे, व त्या ठरावानुसार महाराष्ट्र सरकारने ती जागा हस्तांतरीत केली आहे. म्हणून आपण त्या ठरावानुसार नविन बांधकाम करण्यात येत असलेल्या ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे नांव देण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.


Protected Content

Play sound