जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सानेगुरूजी चौकातील प्रकाश मेडीकल समोरून वयोवृध्दाची १५ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, कैन्हयालाल मेघराज कृपलाणी (वय-७३) रा. आनंद नगर, मोहाडी प्लॉट, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता कैन्हय्यालाल कृपलाणी हे शहरातील साने गुरूजी चौकातील प्रकाश मेडीकल येथे आले होते. दरम्यान, त्यांच्या खिश्यातील १५ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू मोबाईल कुठेही मिळून आला नाही. अखेर रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.