यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे येथिल श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी व १२ वी च्या ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाले.
चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात मुंबई येथे शिक्षणाधिकारी म्हणुन कार्यरत मोहरद येथिल राहीवाशी राजु अमिर तडवी यांच्याकडून ११५ विद्यार्थ्यांना अपेक्षित संच वितरीत करण्यात आले. यावेळी मोफत अपेक्षित मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला.
यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील विद्यालयात दि ३१ रोजी इयत्ता दहावी चे ५०,बारावी चे ६५ असे एकुण ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव जगन्नाथ कोळी यांच्या हस्ते विद्यार्थांना संच वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक डी. बी. मोरे,एम पी पाटील,एम आर चौधरी, एस एन चौधरी, एन जे पाटील,पी एस सोनवणे,प्रा शारदा चौधरी,प्रा राकेश अडकमोल,प्रा जमिला तडवी वस्ती गृहाचे अधिक्षक चंद्रकांत चौधरी, चौकीदार योगेश सोनवणे,कर्मचारी रविंद्र पाटील, कैलास धनगर,पालक आदी उपस्थित होते.
दरम्यान मुंबई येथे सेवेत कार्यरत असलेले शिक्षणाधिकारी राजु तडवी यांना विद्यालयातील उपशिक्षक प्रशांत सोनवणे यांनी प्रयत्न करीत परिसरातील आदीवासी सामाजिक कार्यकर्ते रमजान तडवी यांना संपर्क करुन अपेक्षित मोफत उपलब्ध करुन दिले. विद्यार्थांना अपेक्षित मोफत मिळवून दिल्याबद्दल संस्थेकडून सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय गोसावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्यालयातील शिक्षक सुधिर चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.