मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मतदारसंघातील विविध कामांसाठी २५१५ लेखाशीर्षच्या अंतर्गत १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मतदार संघातील ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या विविध विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मुक्ताईनगर मतदासंघांचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५ -१२३८) अंतर्गत सुमारे १५ कोटी रुपये निधीच्या मंजुरी सह विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यतेसह मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये मतदार संघातील श्री स्वामी समर्थ दिंडोरी सेवा मार्ग भक्त परिवार तसेच हरीच चैतन्य जी महाराज भक्त परिवार यांचेतर्फे विशेष मागणी केल्याने मौजे दिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ डोम उभारणे (५० लक्ष) व हरीचैतन्य वृद्धाश्रम जवळ मौंजे दाताळा येथे गट नं.६४४ मध्ये डोम उभारणे (५० लक्ष) या बांधकामांना देखील मंजूरी मिळालेली आहे.
यासोबत मतदार संघातील रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील खालील प्रमाणे भरीव निधीसह मंजुरी मिळालेली आहे. यात मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या गावांमध्ये असलेल्या अडचणी समस्या व मागणीनुसार डांबरीकरण , कॉंक्रिटीकरण, सभा मंडप सभागृह गटार बांधकाम तेव्हा ब्लॉक बसविणे चौक सुशोभीकरण करणे पुतळा सुशोभीकरण करणे संरक्षण भिंत बांधकाम करणे आदी मूलभूत व विकास कामांसाठी निधीसह मंजुरी मिळाली आहे. या आशयाचे चार स्वतंत्र जीआर जाहीर झालेले आहे.