जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भवानीपेठ परिसरातून एकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत मंगळवारी २७ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल दुल्लभ पाटील व 58 रा.सूर्या सामीलच्या पाठीमागे, भवानी पेठ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे त्यांची मालकीची (एमएच १९ बीडी ५१४०) क्रमांकाची दुचाकी आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्किंग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. अनिल पाटील यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय मराठे करीत आहे.