जळगाव (प्रतिनिधी) डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर शासन करावे तसेच रॅगिंगविरोधात सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये समित्या गठीत करून कार्यान्वित करण्याची मागणी भाजप युवा मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्च्याच्या सचिव गीतांजली ठाकरे, सोनाली साळुंखे, महेश्वरी तायडे, शारदा सोनवणे, स्वाती तायडे, शुभांगी सोनवणे, चंद्रशेखर कोळी, तन्मय कोळी, जयंत चव्हाण, आनंद सपकाळे, आकाश सोनवणे, योगेश सपकाळे, युनुस तडवी, इम्रान तडवी आदी उपस्थित होते. राज्यात अँटी रॅगिंग कायदा असून देखील संस्थाचालक या कायद्याबद्दल अनभिज्ञ व पूर्णपणे बेजबाबदार आहेत. तरी सर्व संस्थाचालकांना त्यांच्या शैक्षणिक संकुलात समित्या गठीत करण्याचे आदेश द्यावेत व त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांचे फोन नंबरसह नोटीस बोर्डावर शैक्षणिक संस्थेत लावण्यात भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.