अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे आयोजन बुधवार, दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष श्याम पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव, अभिनेते भरत जाधव, सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे, इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजराजे भोसले आदी मान्यवर या रौप्यमहोत्सवी अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडतर्फे देण्यात आली. संभाजी ब्रिगेडने तरुणांसाठी अर्थकारणाची चळवळ सुरु केली असून या अधिवेशनाच्या माध्यमातुन अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी sambhajibrigade.org या संकेतस्थळाला भेट देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.