Home Cities अमळनेर अमळनेरात कारच्या सायलेन्सरची चोरी

अमळनेरात कारच्या सायलेन्सरची चोरी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील त्रिमूर्ती नगरात ४ चाकी वाहनाचे १२ हजार रुपये किमतीचे सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी सोमवारी २६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र राजेंद्र पाटील (वय-२८) रा. मामाची व्यायाम शाळा, गोष्टी गल्ली, फरशी रोड अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची कार क्रमांक (एमच १९ डीव्ही ३१६७) आहे. त्यांचा चालक निलेश गोकुळ शेले रा. त्रिमूर्ती नगर, शिरूर नाका, अमळनेर हा कार घेवून त्याच्या घरासमोर रविवारी २५ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता पार्क करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ४ चाकी वाहनाचे १२ हजार रुपये किमतीचे सायलेन्सर चोरून नेल्याचे सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आले. याप्रकारे रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound