जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या लोकार्पण सोहळा रविवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून नशिराबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन सुसज्य प्रशासकीय इमारत व्हावी, अशी मागणी नशिराबादकरांनी राज्य शासनाकडे केली होती. दरम्यान शासनाकडून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मंजुरी देऊन तात्काळ इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. नुकतेच या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषदेचे मादी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षाा रंजनाताई पाटील यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी व नशिराबाद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.