Home क्राईम पिंपळगाव बु॥ येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपळगाव बु॥ येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या


death penalty hanging

पहूर ता. जामनेर (वार्ताहर)। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बु॥ येथील 18 वर्षीय तरूणाने बुधवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. सोहेब रहेमान तडवी असे मयत तरूणाचे नाव आहे.

याप्रकरणी पहूर पोलीसात अकस्मात म्रुत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बु शिवारातील पंडीत किसन मोहने यांच्या शेतात सोहेब रहेमान तडवी याने बूधवारी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच घटनास्थळी साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, ज्ञानेश्वर बावीस्कर, किरण गायकवाड हे दाखल झाले. पोलीसांनी पंचनामा करून गुरुवारी पहूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केले. व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सोहेबच्या आई वडीलांचे निधन झाले असल्याने तो बहिणीकडे राहात होता. जमीर वली तडवी यांच्या खबरीवरून पहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढीत तपास किरण गायकवाड करीत आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound