Home क्राईम रावेर शहरातील तिघांना हद्दपारीचा दणका

रावेर शहरातील तिघांना हद्दपारीचा दणका

0
35

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातील रहिवासी असणार्‍या तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तिघांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रामकुमार यांनी रावेर तालुक्यातील तिघांना सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. या संदर्भातील आदेश पारीत करण्यात आले आहेत. रावेरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमिवर पोलीस स्थानकातर्फे गुन्हेगारांची इत्यंभूत माहिती जमा करण्यात आली होती. यात सद्दाम शेख लुकमान ( वय २०); सादीक शेख लुकमान ( वय २३) आणि जावेद शेख लुकमान ( वय २७) या हतेहनगर भागातील रहिवासी असणार्‍या तिघांच्या विरोधातील हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक रामकुमार यांनी या तिघांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. रावेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन-पाटील यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound