मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सावदा येथे काही दिवसांपूर्वी गोरक्षकांवरती प्राणघातक हल्ला झाला होता. त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई, व्हावी याकरिता मुक्ताईनगर येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम सेना यांच्या वतीने पोलीस स्टेशन मुक्ताईनगर येथे निवेदन देण्यात आले.
सावदा येथे झालेल्या गोरक्षकांवर व हिंदू बांधवांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे व मुक्ताईनगर मध्ये गो तस्करी सर्रासपणे चालू आहे तरी पोलीस प्रशासनाने त्वरित पाऊस उचलून या संदर्भातील मुक्ताईनगर मधील गौतस्करी थांबवली पाहिजे तसेच संत मुक्ताई भूमीमध्ये मांस विक्री उघड्यावर सुरू आहे ते पण थांबवली पाहिजे असे निवेदन आज मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले यावेळी उपस्थित बजरंग दल, श्रीराम सेना व विश्व हिंदू परिषद चे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आकाश बेलदार, प्रकाश गोसावी, सचिन शिरपाटली, जयेश कोळी, पवन सोनवणे, विजय पुलाखारी, सागर सोनवणे, भावेश तळेले, गौरव तळले, भावेश बिरारी, तेजस झांबरे, दर्शन ठाकूर, सुदर्शन सोनार, ओम वाडी, तुषार जोगी, प्रवीण जयकर, किरण जाधव, गितेश कात्रे, जयेश सोनटक्के, प्रथमेश पाटील, सोहम माळी, कुलदीप सूर्यवंशी, दुर्गेश कांडेलकर, विवेक बोराखडे, ओम तळेले, अंकुश तळेले, जयेश कुमार, स्वप्निल तळेले व समस्त हिंदू बांधू उपस्थित होते.