जळगाव ग्रंथोत्सवाची उत्सहात सांगता

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महराष्ट्र शासन व तंत्रविज्ञान विभागाच्या ग्रंथालय संचलनालयाच्या अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यलय आयोजित जळगावात ग्रंथोत्सव २०२२ च्या दुसऱ्या दिवशी आज सकाळच्या प्रथम सत्रात “प्रसारमाध्यमांचा वाचन संस्कृतिवर होणारा परिणाम” या विषयावरील परिसंवादात मान्यवरांनी आपले विचार मांडलेत.

 

प्रसारमाध्यमांचा वाचन संस्कृतिवर होणारा परिणाम” या परिसंवादामध्ये  लाइव्ह ट्रेंडस न्यूजचे मुख्य संपादक शेखर पाटील  यांनी बदलत्या प्रसारमाध्यमाबरोबर प्रत्येकाने समरस होणे हि काळाची गरज असल्याबाबत नमुद केले. व एम. जे. कॉलेजचे ग्रंथपाल  विजय कंची यांनी आधुनिकतेची कास धरावी तसेच प्राचीन काळापासुन ते आभासी जगापर्यंतचा प्रवास उलगडला याबाबतचे अतिशय सुंदर असे विवेचन केले. यासोबत व. वा. वाचनलायाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी प्रसार माध्यमांचा वाचन संस्कृतीवर कसा परिणाम करतो याबाबत आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा  जिल्हातील अनेक पदधिकारी, ग्रंथपाल तसेच विदयार्थी यांनी लाभ घेतला. त्यानंतर दुपारी २ वाजता दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले यांच्या अध्यक्षतेखाली “हास्यरंग’ (थोड बसा आणि पोटभर हसा ) हा तुफान विनोंदी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते हे औरंगाबादचे मराठवाडा एक्स्प्रेस प्रा. विष्णू सुरासे  हे होते.  मा.टाले यांनी  निखळ मनोरंजन कसे असावे याबाबत उपस्थित श्रोत्यांना मार्गदशन केले. त्यानंतर दुपारी ४ वाजता ज्या ग्रंथालयांनी या ग्रंथोत्सवात उपस्थिती लावली त्या सर्व ग्रंथालयांना प्रमाणपत्र वितरण, तसेच या सोहळ्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे निवासी जिल्हाधिकारी  राहूल पाटील,  व जिल्हा नियोजन आधिकारी प्रतापराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार केला गेला.

समारोप भाषणात निवासी जिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी ग्रंथोत्सह यशस्वी पणे केल्याबददल आयोजकांचे कौतुक केले तसेच जिल्हा नियोजन आधिकारी प्रतापराव पाटील साहेब यांनी आपल्या भाषणात दोन दिवस घेतलेला ग्रंथोत्सव अतिशय सुंदर असा उपक्रम आहे असे शेवटी सांगतिले.  जिल्हा ग्रंथालय अधिकारी  सुहास रोकडे यांनी आभार मानले.  सुत्रसंचालन  सुनील जगताप यांनी केले,  यशस्वीतेसाठी संपत वाघचौर किरण चौधरी, केदारनाथ सोनार, तसेच रावसाहेब पाटील, गंगाराम नन्न्वरे, रवि पाटील, संतोष पाटील, योगेश पाटील, मंगल पाटील आदींनी कामकाज पाहिले.

Protected Content