अंगणवाडी सेविकांना संगणकीय प्रणालीचे प्रशिक्षण

93e0117a fec2 401a a7e3 4bd013755824

यावल (प्रतिनिधी) येथील बाल विकास एकात्मीक विभागाद्वारे वितरीत करण्यात आलेल्या मोबाईलद्वारे अंगणवाडी सेविकांना संगणकीय प्रणालीशी जोडण्यासाठी तालुका पातळीवर बिटनिहाय प्रशिक्षण देण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, राज्य शासनाने संपुर्ण राज्यात जिल्हानिहाय तालुका पातळीवर अंगणवाडी सेविकांना दैनंदिन आपल्या कार्याचा लेखाजोखा स्थानिक पातळीवर तात्काळ व अधिक पारदर्शी करण्याच्या दृष्टीने बिटनिहाय प्रशिक्षण देण्याचे काम सुरु केले आहे. त्यानुसार यावल तालुक्यातील २५५ अंगणवाडयांच्या २५५ अंगणवाडी सेविकांना अधिक बळकट करण्यासाठी आय.सी.डी. एस. विभागाब्दारे मोबाईल वितरीत करण्यात आली असून या मोबाईलच्या माध्यमातून कशा प्रकारे आपणास संगणकीय प्रणालीशी जोडता येईल. तसेच इतर कार्यालयीन कामकाजाला कशा प्रकारे मोबाईलव्दारे अधिक सक्षम आणी प्रभावशाली करता येईल, याबाबत मार्दर्शन सुरु आहे. या करीता सर्व अंगणवाडी सेविकांना अचुक संगणकीय प्रशिक्षण देण्याचे कार्य यावल तालुक्यातील हिंगोणा, न्हावी, बामणोद, पाडळसा, भालोद, किनगाव, नायगाव, साकळी, सावखेडा सिम अशा ९ बिटवर सुरु आहे. यासाठी अलका कुरकुरे, संजना वडमारे,अर्चना अठवले, पुनम ठाकरे कल्पना तायडे कल्पना भंगाळे, आणी संध्या रोझोदकर या सात पर्यवेक्षीका अंगणवाडी सेविकांना संगणकीय प्रशिक्षण देत आहे. सदरचे हे प्राक्षिक्षण लवकरच पूर्ण होणार आहे.

Add Comment

Protected Content