जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय येथे २६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र वाघूळदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्राचार्य राजेंद्र वाघूळदे यांनी पुढे सांगितले की, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयातर्फे प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद इनोव्हेटिव सस्टेनेबल प्रक्टिसेस इन सायन्स अंड टेक्नोलॉजी या विषयावर होणार असून ८८ शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन शनिवार २६ नोव्हेबर रोजी सकाळी १०.३० वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. महेश्वरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष आ. शिरीष चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आर. एस. पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ऑस्ट्रेलिया यथील २ प्राध्यापक व १२ विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या परिषदेचा समारोप सायंकाळी ५ वाजता डॉ. जे. एन. चौधरी, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. आर. बी. वाघूळदे, प्राचार्य राकेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.