जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जान्हवी समोर पायी जाणाऱ्या अनोळखीच व्यक्तीला वाहनाने जोरदार धडक दिली होती. त्यात अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता अज्ञात वाहन चालकाविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या जळगाव भुसावळ रोडवरील हॉटेल जानवी समोरून १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता एक अनोळखी पुरुष पायी जात होता. त्यावेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या अनोळखी व्यक्तीचा 25 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचे सखोल चौकशी केल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार संजय एकनाथ शेलार यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अज्ञात वाहन चालका विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.