जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | युवासेनेच्या वतीने जळगाव शहरामध्ये असलेल्या कॉलेजमध्ये दि २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत नवीन मतदार नावनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन मतदार नावनोंदणी शिबिरात १८ वर्ष पूर्ण केलेले युवक व युवती ज्यांचे नाव मतदान यादीत नाही आहे ते आपला नाव या शिबिरात नावनोंदणी करू शकतात. महापौर सेवा कक्ष यांच्या संकल्पनेतुन प्रत्येक युवक व युवती यांना आपला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी या शिबीराचे युवासेनातर्फे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे , महानगर प्रमुख शरद तायडे ,युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, कॉलेज कक्षप्रमुख प्रितम शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले यावेळी महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, विधानसभा प्रमुख अमित जगताप, शहर प्रमुख गिरीश कोल्हे , गजू कोळी, उपमहानगर प्रमुख जय मेहता, अजिंक्य कोळी, विभाग प्रमुख ऋषिकेश शर्मा,रवींद्र गवळी,नीरज चौधरी,यश लोढा, गायत्री भोईटे, ऋतुजा चौधरी तसेच आदी युवासैनिक उपस्थित होते.