वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केले. त्याचा निषेध करण्यासाठी सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी बस स्टँड चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे राज्यपाल कोशारीसह सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतीमा दहन करण्यात आली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करुन पोलिस स्टेशनला सपोनी आशिषकुमार अडसूळ यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी मराठवाडा विद्यापीठ पदवी प्रदान सोहळ्यात बोलतांना छञपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील हिरो होते आताच्या काळात गडकरी, फडणवीस हे हिरो आहे. असे वक्तव्य करुन तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखवल्या. तसेच दुसरे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी चारवेळा औरंगजेब यांना माफी मागितली असे बेताल वक्तव्य केले. दोन्हीनी असे बोलून महाराष्ट्राची अस्मिता दुखवली गेली. कोशारी यांनी पूर्वी देखील महात्मा फुले दाम्पत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होतें. असे वारंवार बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल यांना वेड्याच्या दवाखान्यात दाखल करावे, महामहीम राष्ट्रपती यांनी राज्यपाल यांना पदमुक्त करावे. कोशारी हे नेहमी महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करीत असतात. राज्यपाल कोशारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, विलास मुळे, तालुका उपप्रमूख सुभाष चौधरी, वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, अल्प संख्यांखं संघटक सईद शेख, जिल्हा युवासेना अधिकारी चंद्रकांत शर्मा, उप शहरप्रमुख सुखदेव धनगर, अशोक शर्मा, संजू कोळी, आबा सोनार, उप सरपंच उल्हास भारसके, प्रकाश कोळी, भुरा धरणे, प्रल्हाद माळी, इरफान खान, विक्की मोरे, राजेश महाजन, प्रविण बकोळे, संजय खाराते, मोहन धनगर, शिवा भोई, किरणं माळी, राम शेटे यांच्यासह शिवसैनिक मोठया संखेने उपस्थित होतें.