Home क्राईम डॉ. पायल तडवी आत्महत्या : तिन्ही आरोपी डॉक्टर अटकेत

डॉ. पायल तडवी आत्महत्या : तिन्ही आरोपी डॉक्टर अटकेत

tadvi suicide
tadvi suicide

tadvi suicide
 

मुंबई (वृत्तसंस्था) डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही फरार आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. अंकिता खंडेलवालला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या तिघींनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

अटक केलेल्यांमध्ये डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. यातील आहुजा व खंडेलवाल हिनं अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गुन्ह्यांमध्ये अजामीनपात्र कलमे लावण्यात आल्याने त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे. दरम्यान, डॉ भक्ती मेहेरला मंगळवारी दुपारी सत्र न्यायालयाच्या बाहेर अटक करण्यात आली होती. तर डॉ हेमा अहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. आग्रीपाडा पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. महिलेला रात्री अटक करणं कायदेशीर नसल्याने डॉ हेमा अहुजाला अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound