Home राजकीय धर्मांतरणासाठी दबाव : हिंगोलीत तरूणीला जिवे मारण्याची धमकी

धर्मांतरणासाठी दबाव : हिंगोलीत तरूणीला जिवे मारण्याची धमकी

0
30


हिंगोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे आफताबचे प्रकरण गाजत असतांना धर्मांतरणासाठी दबाव टाकून तरूणीला जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत समोर आला आहे.

कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील रहिवासी साजिद रफीकखाँ पठाणने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर आरोपीने संबंधित तरुणीवर डोंगरकडा, औरंगाबाद, फरीदाबाद , दिल्ली अशा विविध ठिकाणी अत्याचार केले. दोन महिन्यानंतर हे दोघेही डोंगरकडा येथे परत आले. त्यानंतर आरोपी साजिदकडून पीडित युवतीवर धर्मांतरासाठी दबाव आणला गेला व त्यासाठी विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

पीडितीने आरोपीविरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला काल रात्रीच ताब्यात घेण्यात आलं आहे.


Protected Content

Play sound