Home Cities अमळनेर नंदगावच्या श्रीराम मंदिरास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

नंदगावच्या श्रीराम मंदिरास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

0
42

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नंदगाव येथील श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत ‘ब’ दर्जा प्राप्त नुकताच प्राप्त झाला. या पार्श्वभूमीवर नंदगाव परिसरासह तालुक्यातील भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा ग्रामस्थ व तालुकावासीयांनी ऋणनिर्देश केला. याअगोदर मंदिराला अगोदर ‘क’ वर्गाचा दर्जा दिला होता. आता मंदिराला ‘ब’ वर्गचा दर्जा मिळाला याबद्दल  प्रयत्न करणारे प.पू. ईश्वरदासजी महाराज, लोकप्रतिनिधी यांचे पंचचक्रोशीत कौतुक होत आहे.   अमळनेर शहरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर नंदगाव येथे बोरी नदीच्या तीरावर श्रीराम मंदिर संस्थान आहे. ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्याने मंदिर व परिसराचा विकास होणार आहे. भाविकांची सोय होणार असून ही बाब तालुक्यासाठी भूषणावह आहे. हा परिसर बोरी काठावर अत्यन्त निसर्गरम्य असून पर्यटनास मोठा वाव असणार आहे.

 


Protected Content

Play sound