ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर भागामध्ये शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याला खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह पदाधिकार्यांची देखील उपस्थिती होती. या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते दाखल होऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला असला तरी शिंदे समर्थक नरेश म्हस्के यांनी हा दावा फेटाळून लावत ठाकरे गटानेच मारहाण केल्याचा दावा केला. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.