Home राजकीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेत २२० जागा जिंकण्याचा आत्मविश्‍वास

मुख्यमंत्र्यांना विधानसभेत २२० जागा जिंकण्याचा आत्मविश्‍वास

0
20

मुंबई प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीत युती निश्‍चीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२० जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतही दणदणीत बहुमत मिळवण्याचा आत्मविश्‍वास व्यक्त केला आहे. यात आगामी विधानसभेत युती होणार का ? या प्रश्‍नाचे हो उत्तर देत त्यांनी या निवडणुकीतही जोरदार यश संपादन करणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा आमचा निर्णय योग्य आणि फलदायी ठरला. उद्धव ठाकरे आणि मी प्रचाराची धुरा सांभाळली आणि त्याला महाराष्ट्रातील जनतेचाही मोठा प्रतिसाद मिळाला. समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना पाठिंबा दिल्याचेच या निकालातून दिसून आले. हेच यश आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राखून आम्ही नवा विक्रम प्रस्थापित करणार आहोत. विधानसभेत युती २२० जागांचा टप्पा ओलांडणार असल्याचे फडणवीस म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound