यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी यावल तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.
तालुक्यातील ज्या आठ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर 2022 मध्ये संपत आहे, अशा आठ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचांसह सदस्य पदांच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका या डिसेंबरमध्ये होत आहे. दरम्यान, सर्वाच्च न्यायलयाच्या विशेष अनुमती २०२१च्या संलग्न याचिकांमध्ये दिनांक ४ मे २०२२ च्याअंतरिम आदेशामध्ये १० मार्च २०२२ रोजीच्या टप्प्यापासुन पुढील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुसार आयोगाच्या दिनांक ६ ते ३० मे २०२२, दिनांक ०३ जून २०२२ प्रभाग रचना पुर्ण करण्यात आली असुन यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत होवु घातलेल्या पंचवार्षीक सार्वत्रीक निवडणुकीसाठी या गावांचा समावेश आहे.
यावल तालुक्यातील दिनांक १८ / ११ / २०२२शुक्रवार पासुन या संपुर्ण निवडणुकीच्या प्रक्रीयेस सुरुवात होणार असुन दिनांक १८ डिसेंबर २०२२रविवार रोजी या निवडणुकी साठी मतदान होणार असुन या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षाच्या दृष्टीने सर्वांचे लक्ष वेधणारी न्हावी प्रगणे यावल या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीसह तालुक्यातील चुंचाळे, पिळोदे बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द ,चिखली बुद्रुक, कासारखेडे, चितोडा या गावांच्या ग्रामपंचायतीचा या निवडणुकीत समावेश आहे. दरम्यान निवडणुकीचे कार्यक्रम जवळ येणार असल्याची पुर्वकल्पना असल्याने गावपातळीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.